चोपडा येथील जिनिंगमधून साडेआठ लाखांची रोकड लंपास

By चुडामण.बोरसे | Updated: June 4, 2023 16:08 IST2023-06-04T16:07:37+5:302023-06-04T16:08:01+5:30

चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल

Cash of eight and a half lakhs was looted from ginning in Chopra | चोपडा येथील जिनिंगमधून साडेआठ लाखांची रोकड लंपास

चोपडा येथील जिनिंगमधून साडेआठ लाखांची रोकड लंपास

शाम जाधव, चोपडा (जि.जळगाव): यावल रस्त्यावरील हिरा कॉटन जिनिंगमधून चोरट्यांनी साडेआठ लाखांची रोकड चोरुन नेली. चोरीचा हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आली. पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी अंगावरचे शर्ट काढून चेहऱ्यावर बांधत आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. चोरीस गेलेल्या रकमेतील सर्व नोटा या शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नोटा असल्याचे जिनिंगचे मालक सुनील जैन यांनी सांगितले.

याबाबत चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका सराफा दुकानातून पहाटे जबरी चोरी झाली होती, मात्र त्या चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.

Web Title: Cash of eight and a half lakhs was looted from ginning in Chopra