The case registered against the three by the assault of a dog in Dahisar | दहिसरमध्ये श्वानाला मारहाण केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा
दहिसरमध्ये श्वानाला मारहाण केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्दे शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याला दहिसर परिसरात श्वानाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत.रहिवाशी चिराग जोगनी आणि त्याच्या मित्रांनी श्वानाला मारहाण केल्याची माहिती मिळताच त्यांनी, दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

मुंबई - दहिसरमध्ये त्रिकुटाकडून श्वानाला बांबूने बेदम मारहाण केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. यात, श्वान गंभीर जखमी झाला असून, दहिसर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथीलच सीएस रोड परिसरातील चैतन्य मेहता (२२) या तरुणाचा आॅटो मोबाईल स्पेअर पार्ट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तो बोरिवली पुर्वेकडील मुंबई अ‍ॅनिमल असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेसाठी काम करतो. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याला दहिसर परिसरात श्वानाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्याने प्राणीमित्र दुर्गेश कोलपाटे याला घटनास्थळी पाठविले. तेव्हा, गंभीर जखमी होऊन श्वान रस्त्यावर पडलेला दिसून आला. अखेर त्यांनी रुग्णवाहीकेतून त्याला उपचारांसाठी नेले. दरम्यान, येथील रहिवाशी चिराग जोगनी आणि त्याच्या मित्रांनी श्वानाला मारहाण केल्याची माहिती मिळताच त्यांनी, दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत.


Web Title: The case registered against the three by the assault of a dog in Dahisar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.