भाजपच्या नेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:29 IST2020-09-19T01:29:38+5:302020-09-19T01:29:53+5:30

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावरविरोधात गुन्हा दाखल केला.

A case has been registered in the police station for physically abusing a BJP leader by showing him the lure of marriage | भाजपच्या नेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा

भाजपच्या नेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा

मीरा रोड : भाजपचे स्थानिक नेते सय्यद मुनावर हुसेन याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता ३३ वर्षांची असून ती २०१२मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली. नंतर त्याच्या मीरा रोड येथील मायक्रॉन कन्स्ट्रक्शन कंपनीत ती काम करू लागली. तेथे दोघांचे प्रेमसंबंध जुळले व मुनावरने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. या दोघांच्या संबंधांची माहिती त्याच्या पत्नीला मिळाल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. नंतर फिर्यादीने नोकरी सोडली. त्यानंतरही मुनावर याने पीडितेशी शरीरसंबंध ठेवले. पीडिता मुनावरकडे खर्चासाठी पैसे मागायला गेली असता त्याने तिला मारहाण केली. त्याप्रकरणी तिने पोलिसात फिर्याद दिली होती. पीडितेला समजले की मुनावर याने दुसरे लग्नही केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावरविरोधात गुुन्हा दाखल केला.

Web Title: A case has been registered in the police station for physically abusing a BJP leader by showing him the lure of marriage