मायलेकीस कोयत्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण, तीन जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:57 IST2020-05-23T19:56:59+5:302020-05-23T19:57:10+5:30
देणगीच्या पैशावरून दोन महिन्यांपुर्वी दोन गटात झालेल्या वादातून मारहाण

मायलेकीस कोयत्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण, तीन जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
राजगुरुनगर : वाळद (ता. खेड )येथे हनुमान मंडळाचे देणगीच्या पैशाचे कारणावरून दोन महिन्यांपुर्वी वाद केल्याचे कारणावरून मनात राग धरून मायलेकीस कोयत्याने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब भागुजी कोरडे (वय ५३,रा. वाळद ता.खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन खेड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळद येथे हनुमान मंडळाचे देणगीचे पैशाचे कारणावरून दोन महिन्यांपुर्वी वाद दोन गटात वाद झाला होता. या कारणावरून मनात राग धरून आकाश हुरसाळे (रा. मंदोशी हुरसाळे वस्ती ता.खेड)राहुल उर्फ डॅनी बांगर (रा. वाळद ता.खेड),आषु मोरे (रा.शेटेवाडी वाडा ता.खेड)यांनी फिर्यादींच्या घराजवळ येऊन कोरडे यांच्या पत्नीस तुझा नवरा कोठे आहे त्याला खल्लास करायचे आहे असे म्हणुन कोयते हातात धरून नाच करून दहशत माजवली. तसेच पोखरकर यांचा खून करायचा आहे. असे म्हणुन घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले . त्याचप्रमाणे फिर्यादीच्या मुलीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. पत्नीस कोयत्याने डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मुलाचा खून करतो अशी धमकी दिली. पुुढील घटनेचा तपास पोलीस करत आहे.