A case has been registered against a BJP leader in Nagpur | नागपुरात भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

नागपुरात भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देबांधकाम पाडून साहित्य लंपास : हुडकेश्वर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्याचे बांधकाम पाडून तेथील साहित्य चोरी केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण नागपूरचे पदाधिकारी विलास करांगळे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखला केला.
पलाश अंगेश्वर विंचूरकर (वय २५, रा. अयोध्यानगर) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली खुर्द येथे विंचूरकर यांचा भूखंड आहे. विंचूरकर यांनी तेथे बांधकाम केले होते. काही महिन्यांपूर्वी करांगळे आणि त्यांचे दोन साथीदार तेथे आले. हा भूखंड माझा असून, तो रिकामा करण्याची धमकी दिली. त्यानंतर वेळोवेळी करांगळे यांनी इमारत पाडून भूखंड रिकामा करण्यासाठी विंचूरकर यांना धमकावले. २४ जानेवारीला करांगळे व त्यांच्या साथीदारांनी इमारत तोडून त्यातील साहित्य चोरी केले. विंचूरकर याने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. करांगळे हे एका माजी आमदाराचे अत्यंत विश्वासू असल्याची माहिती आहे.

Web Title: A case has been registered against a BJP leader in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.