शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

संदीप नाहरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी अन् सासूविरोधात गुन्हा 

By पूनम अपराज | Published: February 18, 2021 9:18 PM

Sandeep Nahar Suicide : कार्पेन्टरने दार तोडले. त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांनी संदीपला पंख्याला लटकलेला असताना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले.

ठळक मुद्देमृत संदीपच्या वडिलांच्या केलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०६ अन्वये संदीपची पत्नी कंचन आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत संदीपच्या वडिलांच्या केलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कंचन शर्मा संदीप नहारचा मृतदेह घेऊन दोन रुग्णालयात फिरत राहिली. संदीपला रुग्णालयात मृत घोषित झाल्यानंतर कांचनने पोलिसांना कळविल्याशिवाय मृतदेह आपल्यासोबत घरी नेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने खोलीच्या दरवाजाला गळफास लावून आत्महत्या केली. हे जेव्हा त्याची पत्नी कंचन यांना समजले तेव्हा त्यांनी कार्पेन्टर यांना दरवाजा तोडण्यासाठी सांगितला. कार्पेन्टरने दार तोडले. त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांनी संदीपला पंख्याला लटकलेला असताना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले.

 

 

कार्पेन्टरचे स्टेटमेंट महत्वाचे असू शकतेतथापि, आत्महत्येच्या प्रकरणामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला. यानंतर त्याला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कंचनने मृतदेह घरी नेला आणि त्यानंतर पोलिसांना त्याविषयी माहिती दिली असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. जेणेकरुन मृत्यूचे कारण कळू शकेल. या प्रकरणात कार्पेंटरने खोलीचा दरवाजा उघडण्याबाबत दिलेला जबाब महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आज पोलीस त्याचा जबाब नोंदवू शकतात.

मृत्यू होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलासंदीपने आत्महत्या कशी केली हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. डीसीपी विशाल ठाकूर म्हणाले, "संदीपची पत्नी कंचन यांनी संदीपचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. तिने दोन व्यक्तींच्या मदतीने मृतदेह खाली आणला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. 

 

कोण होता संदीप नाहर?नीरज पांडे दिग्दर्शित "धोनी: द अनटोल्ड स्टोरी" चित्रपटात सुशांतसिंह राजपूत याच्या मित्राची म्हणजेच परमजित सिंग अर्थात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. याच छोटू भैय्यानं धोनीला त्याची पहिली क्रिकेटची बॅट दिली होती. धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटातील भूमिकेनंतर संदीप नाहरने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका केली. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटात संदीप नाहरने भुट्टा सिंग नावाची सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. संदीप नाहरचा हाच शेवटचा चित्रपट ठरला आहे. संदीप नाहर हा मूळचा चंदीगढचा असून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला होता.

 

 

टॅग्स :sandeep naharसंदीप नहारSuicideआत्महत्याMumbaiमुंबईPoliceपोलिसbollywoodबॉलिवूड