शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; सोमय्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:47 IST

पगार न देणे, प्रोविडन्ट फंड हडप करणे  त्याविरोधात कलम 406,409,34 भा दं वि अंतर्गत कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. 

मनिषा म्हात्रे

मुंबई - मागील काही दिवसांपासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली. 

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट कंपनी, एम पी एंटरप्राईस, बेस्ट ( मुंबई महापालिका) व अन्य कंपन्या विरुद्ध १००० कर्मचाऱ्यांची फसवणूक करणे, पगार न देणे, प्रोविडन्ट फंड हडप करणे  त्याविरोधात कलम 406,409,34 भा दं वि अंतर्गत कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. 

काय आहे आरोप?पेडणेकरांच्या कंपनीविरोधात कर्मचारी ऋषिकेश कदम यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटलंय की, मी पूर्वी बृहनमुंबई महानगरपालिकेच्या BEST विभागांतर्गत वडाळा डेपोमध्ये कंत्राटी पध्दतीने बस चालक म्हणून कार्यरत होतो. एप्रिल २०२१ मध्ये बेस्ट विभागात कंत्राटी पध्दतीवर चालक भरती सुरु असल्याची माझ्या मित्राकडून माहिती मिळाली. मी बांद्रा बस डेपो येथे जाऊन एम.पी. एंटरप्रायजेस अॅण्ड असोशिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचेसमक्ष मुलाखत व चाचणी दिली होती. तेव्हा  माझी बस चालक म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर दिंडोशी डेपो येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण होऊन माझी चालक म्हणून वडाळा डेपो येथे नियुक्ती करण्यात आली होती. मला पगार म्हणून 21144/- रुपये दाखविण्यात आला होता. तर माझा भविष्य निर्वाह निधी व EISI कटींग करून सुमारे 18,144/- रुपये हातात मिळत असे. 

सुरुवातीस नोव्हेंबर २०२१ पर्यंत ह्युमनिक कंपनीकडून आमचा पगार व कटींग वेळेवर होत असे. परंतु ए. पी. एंटरप्रायजेस अॅण्ड असोशिएशन प्रायव्हेट लिमिटेड हि मुळ कंत्राटदार कंपनी असल्याचे मला माहिती झाले होते. हयुमनिक कंपनीने मला मे २०२१ ते नोव्हेंबर २०२१ पगार दिला त्याची स्लीप माझ्याकडे आहे. त्यानंतर अचानक ह्युमनिक कंपनीचे काम बंद होऊन आमच्या पगाराचा सर्व कारभार मूळ कंपनीने ताब्यात घेतला होता. डिसेंबर २०२१ पासून माझा नमुद काळातील भविष्य निर्वाह निधी व ई.एस. आय, सी. माझ्या पगारातून कापून घेतला जात होता परंतु मला पगाराची स्लीप मिळत नव्हती. त्यानंतर UAN नंबर टाकून पाहिले तर तेव्हा कंपनीकडून भरणा होत नसल्याचे निदर्शनास आले असा आरोप करण्यात आला आहे.  

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरKirit Somaiyaकिरीट सोमय्या