विधानभवनातील कर्मचाऱ्याची कार केली चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 22:01 IST2019-08-05T22:01:03+5:302019-08-05T22:01:22+5:30
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानभवनातील कर्मचाऱ्याची कार केली चोरीला
मुंबई - विधानभवनात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याची इनोव्हा कारचोरीस गेली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरिवलीत राहणाऱ्या आणि विधानभवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची इनोव्हा कार गेल्या आठवड्यात चोरीलागेली होती. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. भा. दं. वि. कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.