Baramati Accident News: बारामतीवर शोककळा पसरली; सराफ व्यावसायिकाची पत्नी, मुलगा, बहीणीचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:02 AM2022-01-19T09:02:25+5:302022-01-19T09:03:40+5:30

Baramati Road Accident News: एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे कुटुंब पुण्याला गेले होते. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Car Rams on Tractor trolley Pune Baramti road; Shrenik Bhandari's wife, son milind Bhandari, sister died in Accident | Baramati Accident News: बारामतीवर शोककळा पसरली; सराफ व्यावसायिकाची पत्नी, मुलगा, बहीणीचा अपघाती मृत्यू

Baramati Accident News: बारामतीवर शोककळा पसरली; सराफ व्यावसायिकाची पत्नी, मुलगा, बहीणीचा अपघाती मृत्यू

Next

बारामती: उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून चारचाकीची धडक बसून झालेल्या अपघातातबारामतीतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास बारामती-मोरगाव रस्त्यावर तरडोलीनजिक हा अपघात झाला.

अपघातामध्ये बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहिण आणि बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारार्थ पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे कुटुंब पुण्याला गेले होते. रात्री कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडकून हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती, त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.  बारामती परिसरात धार्मिक कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Car Rams on Tractor trolley Pune Baramti road; Shrenik Bhandari's wife, son milind Bhandari, sister died in Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app