कारचालकाच्या डोक्यात घातला दगड, सांताक्रुझच्या कालिना रोडवरील प्रकार

By गौरी टेंबकर | Updated: February 7, 2024 16:07 IST2024-02-07T16:07:20+5:302024-02-07T16:07:31+5:30

याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Car driver's head stone, type on Kalina Road, Santa Cruz | कारचालकाच्या डोक्यात घातला दगड, सांताक्रुझच्या कालिना रोडवरील प्रकार

कारचालकाच्या डोक्यात घातला दगड, सांताक्रुझच्या कालिना रोडवरील प्रकार

मुंबई: सांताक्रुज पूर्व परिसरात रिक्षाचालकाने कारला धडक दिली. यातून झालेल्या भांडणात रिक्षावाल्याने कार चालकाच्या डोक्यात दगड घालत त्याला जखमी केले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद शेख (३९) हे कलिना रोडवरून त्यांच्या कारने जात असताना समोरून आलेल्या एका रिक्षाचालकाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यावर रिक्षाचालक खाली उतरून त्यांना शिवीगाळ करू लागला. शेख यांनी याचा जाब त्याला विचारल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. तितक्यात रिक्षाचालकाने जवळच पडलेला एक दगड उचलून शेखच्या डोक्यात मारला. 

यात डोळ्याच्या वर दुखापत होऊन रक्तस्राव होऊ लागला. स्थानिकांनी हस्तक्षेप करत दोघांमधील भांडण सोडवली. शेख यांनी  व्ही एन देसाई रुग्णालयात उपचार घेत नंतर वाकोला पोलिसात रिक्षा चाल कविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Car driver's head stone, type on Kalina Road, Santa Cruz