शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कारचा चेंदामेदा! लातूरच्या पाडे कुटुंबावर घाला; भीषण अपघातात चारजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:47 IST

Accident Case : हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.

लातूर / ढोकी (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.   हिरकणाबाई मुरलीधर पाडे ( वय ७०), उमेश मुरलीधर पाडे ( वय ५०), सविता उमेश पाडे (वय ४५) आणि प्रतिक उमेश पाडे (वय २३) असे मृतांची नावे आहेत. लातूर येथील प्रकाशनगर येथे राहणारे पाडे कुटुंबीय काही कामानिमित्त कारने (एम.एच. २४ ए.ए. ८०५५) बाहेरगावी गेले होते. दरम्यान, काम आटोपल्यानंतर ते लातूरच्या दिशेने निघाले असताना शुक्रवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भडाचीवाडी येथे समोरून येणाऱ्या कंटेनरवर नियंत्रण सुटल्याने पाडे यांची कार कंटेनरखाली घुसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोहेका. एस.एस. कट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने मृतांना बाहेर काढून येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले.या आपघाताची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मृतांत एकाच कुटुंबातीलआई,पती-पत्नी व मुलगा ठार... 

या भीषण अपघातात हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय ७०), उमेश मुरलीधर पाडे (वय ५०), सविता उमेश पाडे (वय ४५) आणि मुलगा प्रतिक उमेश पाडे (वय २३, सर्व रा. प्रकाश नगर लातूर) यांचा समावेश आहे. हृदय पिळवटून टाकणारे टाकणाऱ्या आपघाताने पाडे कुटुंबावर घालाच घातला आहे.

लातुरात खासगी वसतीगृह चालवित होते पाडे कुटुंबीय...

उमेश पाडे हे लातुरातील प्रकाश नगर भागात खासगी वसतीगृह चालवित होते. दरम्यान, काही कामानिमित्त ते उस्मानाबादला कुटुंबासह गेले होते. लातूरला परतताना हा भीषण अपघात झाला. अचानकपणे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरवर आदळली. यात कारचा चेंदामेदा झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरDeathमृत्यूPoliceपोलिस