Captured on Thriller CCTV! The young woman was shot dead outside the college after the abduction plot failed | थरार सीसीटीव्हीत कैद! अपहरणाचा डाव फसल्याने तरुणीची कॉलेजबाहेर गोळ्या घालून हत्या

थरार सीसीटीव्हीत कैद! अपहरणाचा डाव फसल्याने तरुणीची कॉलेजबाहेर गोळ्या घालून हत्या

ठळक मुद्दे परीक्षा देऊन ती बाहेर पडली, तेव्हा आय -20 कारमधील एका युवकाने तिला जबरदस्तीने कारमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने गाडीत बसण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर गोळ्या घालून पळ काढला.


दिल्लीला लागून असलेल्या हरयाणामधील बल्लभगड येथून एक खळबळजनक घटना घडली आहे. बल्लभगढ येथे काल एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार मारण्यात आले. विद्यार्थी पेपर देऊन महाविद्यालयातून बाहेर आली. तिच्यावर गोळ्या झाडून मारेकरी आरामात गाडीतून पळून गेले. तेथे बरेच लोक उपस्थित होते. पण मारेकर्‍यांना रोखण्याची हिंमत कोणी केली नाही. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्हीत एक मुलगा एका मुलीला जबरदस्तीने पांढऱ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुलगी त्याच्या हात झडकून आपल्या मैत्रिणीच्या मागे लपण्याच्या प्रयत्न करते, त्यानंतर मुलगा पिस्तूल बाहेर काढून मुलीवर गोळी झाडतो असे या सीसीटीव्हीत दिसत आहेत. 

हरियाणा येथील  फरीदाबादमध्ये महाविद्यालयातून पेपर देऊन महाविद्यालयाबाहेत पडलेल्या विद्यार्थिनीला सोमवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हे प्रकरण बल्लभगडचे आहे, जिथे दिवसाढवळ्या विद्यार्थिनीची हत्या करणारा आरोपी कारचालक फरार झाला. ही मुलगी बीकॉम अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती आणि बल्लभगडच्या अग्रवाल महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा देऊन ती बाहेर पडली, तेव्हा आय -20 कारमधील एका युवकाने तिला जबरदस्तीने कारमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने गाडीत बसण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर गोळ्या घालून पळ काढला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत मुलीचे नाव निकिता असून ती बीकॉमच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी होती.

निकिताच्या वडिलांनी माहिती दिली की, तौफिक नावाच्या तरुणाने निकितासोबत बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. मैत्री करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र, निकिताने त्याला नकार दिला. आरोपींनी २०१८ मध्ये निकिताचे अपहरणही केले होते, मात्र स्थानिकांनी तिची सुटका केली होती.  पोलिसांनी विद्यार्थिनीचा भाऊ नवीन याच्या तक्रारीवरून तौफिकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 


 

 

 

Web Title: Captured on Thriller CCTV! The young woman was shot dead outside the college after the abduction plot failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.