उल्हासनगरात १७ लाखाचा गांजा जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: January 6, 2023 17:16 IST2023-01-06T17:16:18+5:302023-01-06T17:16:48+5:30

 उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटाई बदलापूर ते कल्याण रस्त्यावरील भालपाडा बसस्टॉप येथे एका कर मधून विक्रीसाठी गांजा आल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या अंमली पदार्थ पथकाला मिळाली होती.

Cannabis worth 17 lakh seized in Ulhasnagar, case registered against three | उल्हासनगरात १७ लाखाचा गांजा जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरात १७ लाखाचा गांजा जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालपाडा येथे विक्रीसाठी आणण्यात आलेला १७ लाख ३४ हजाराचा गांजा ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटाई बदलापूर ते कल्याण रस्त्यावरील भालपाडा बसस्टॉप येथे एका कर मधून विक्रीसाठी गांजा आल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या अंमली पदार्थ पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरवारी सकाळी सव्वा ९ वाजता पथकाने धाड टाकून इनोव्हा कारची झडती घेतली असता, त्यामध्ये तब्बल ९० किलो गांजा मिळून आला. बाजारभाव नुसार गांजाची किंमत १७ लाख ३४ हजार ४५० रुपये असून गांजाची साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी रवी मुन्नालाल जैस्वाल, हसीन कयूम खान व मोहम्मद शादाब रियाज यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Cannabis worth 17 lakh seized in Ulhasnagar, case registered against three