शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी घरी नसताना फेसबुक फ्रेंडला घरी बोलावणं पतीला पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:31 IST

Crime News : दिल्लीत राहणाऱ्या पीडित तरुणाची आरोपी तरुणीशी सोशल मीडियाचे माध्यम असलेल्या फेसबुकवर ओळख झाली.

ठळक मुद्देदोघांमध्ये चॅटिंग वाढलं आणि नंतर तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता. अनेक वेळा ते दिल्लीत भेटीगाठी झाल्या.

फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला घरी बोलावणं दिल्लीतील तरुणाला अंगलट आलं आहे. पत्नीच्या गैरहजेरीत घरी आलेली फेसबुक फ्रेण्ड सोनं लुटून पसार झाली. सामान आणण्याच्या बहाण्याने तिने तरुणाला घराबाहेर पाठवलं आणि संधीचा फायदा घेत तिने त्याच्या पत्नीचे दागिने आणि २२ हजार रुपयांसह पोबारा केला.

दिल्लीत राहणाऱ्या पीडित तरुणाची आरोपी तरुणीशी सोशल मीडियाचे माध्यम असलेल्या फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झालं, नंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यामुळे तरुणाने पत्नी घरी नसताना तिला घरी बोलावले. आरोपी तरुणीने चलाखीने त्याला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवलं आणि घर साफ केलं. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ती दागिने आणि पैशांवर डल्ला मारून फरार झाली. तरुणाने तिला फोन केला, तेव्हा त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. कल्याणपुरी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

 

कशी झाली ओळख?

तक्रारदार तरुण त्रिलोकपुरी भागात पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लखनऊमध्ये राहणाऱ्या हेमलता पाठक नावाच्या तरुणीशी त्याची फेसबुकवर ओळख झाली. तिने आपण ज्योतिषी असल्याची बतावणी तरुणासोबत केली होती. फेसबुकवर चॅटिंग झाल्यानंतर दोघांनी नंबर शेअर केले. नंतर दोघांमध्ये चॅटिंग वाढलं आणि नंतर तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता. अनेक वेळा ते दिल्लीत भेटीगाठी झाल्या.

तक्रारदार तरुणाची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. हेमलताने त्याच्या घरी जाण्यात उत्सुकता दाखवली. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवून घर लुटलं. तरुण घरी आला असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले पाहून  त्याला धक्काच बसला. घरातील लॉकर उघडा होता. पत्नीचे दागिने आणि २२ हजार रुपये गायब झाले होते. पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपी तरुणीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिसFacebookफेसबुकHomeघरdelhiदिल्ली