फाेन करून बाेलावले; बेल्टने बेदम झाेडपले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 20:31 IST2023-04-28T20:30:51+5:302023-04-28T20:31:40+5:30
चाैघांवर गुन्हा : लातूर शहरातील घटना

फाेन करून बाेलावले; बेल्टने बेदम झाेडपले!
लातूर : फाेन करून बाेलावून घेत एका युवकाला चार जणांनी बेल्टने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना लातुरातील हाकेनगर भागात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी ओमकार कमलाकर परसे (वय १८, रा. कासती, ता. लाेहारा, जि. धाराशिव) हा सध्याला लातुरातील हाकेनगर भागात वास्तव्याला आहे. दरम्यान, त्यास आदित्य कुलकर्णी आणि त्याच्यासाेबतच्या अनाेळखी तिघांनी संगनमत करून ‘तू काल आदित्यसाेबत मस्करी का केलास’ म्हणून शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय, बेल्टने पाठीवर, बेल्टच्या बक्कलने डाेक्यात, उजव्या हातावर मारून जखमी केले.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.