शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"माझी नाही तर कोणाचीच नाही"; लग्नात नवरीवर झाडली गोळी; माथेफिरू तरुणाचं भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:01 IST

एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका माथेफिरू तरुणाने धक्कादायक कृत्य केलं आहे.

बिहारमधील बक्सर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका माथेफिरू तरुणाने धक्कादायक कृत्य केलं आहे. चौसा नगर पंचायतीच्या एका लग्नात जेव्हा हार घालण्याचा विधी सुरू होता आणि संपूर्ण कुटुंब आनंदात होतं, त्याच वेळी एका माथेफिरू तरुणाने स्टेजवर चढून नवरीवर सर्वांसमोर गोळी झाडली. गोळी लागताच नवरी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि लग्नमंडपात एकच खळबळ माजली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून वरात बक्सरला पोहोचली होती. नवरदेव आणि नवरी आरती कुमारी (१८ वर्षे) स्टेजवर उपस्थित होते आणि विधी पार पाडले जात होते. याच दरम्यान शेजारीच राहणारा दीनबंधू मल्लाह आपलं तोंड बांधून अचानक स्टेजवर चढला. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने पिस्तुल बाहेर काढलं आणि आरतीवर गोळी झाडली. या घटनेनंतर तो माथेफिरू गर्दीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीनबंधू आरतीवर एकतर्फी प्रेम करत होता. आरतीचं लग्न इतर कोणाशी व्हावं, अशी त्याची इच्छा नव्हती. त्याने यापूर्वीही या लग्नाला विरोध केला होता आणि धमकीही दिली होती. त्याने म्हटलं होतं की- "जर ती माझी झाली नाही, तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही." जेव्हा आरतीच्या कुटुंबीयांनी त्याचं ऐकलं नाही, तेव्हा त्याने बदला घेण्यासाठी लग्नाच्या दिवशीच हा भयानक कट रचला.

गोळी लागल्यानंतर नवरीला तातडीने सदर रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे प्राथमिक उपचारानंतर तिची नाजूक अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला ट्रॉमा सेंटर, वाराणसी येथे हलवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या आरतीची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस निरीक्षक चंदन कुमार यांनी सांगितलं की, हे प्रकरण स्पष्टपणे एकतर्फी प्रेम प्रकरण आणि मानसिक विकृतीशी संबंधित आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jealous lover shoots bride at wedding: Horrific act in Bihar.

Web Summary : In Bihar, a deranged man, obsessed with a bride, shot her during her wedding ceremony because she refused his advances. The bride is in critical condition, and police are searching for the suspect, who previously threatened her.
टॅग्स :BiharबिहारFiringगोळीबारmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस