शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 17:52 IST

पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. यावेळी लाल रंगाच्या मर्सिडीज बेंझने त्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यातील कॉफीच्या मळ्यात तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटवणं हे अवघड जात होतं. खूप तपास केल्यानंतर पोलिसांना समजलं की, हा मृतदेह ५४ वर्षीय व्यावसायिक रमेश यांचा आहे, जे काही आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता रमेश यांची पत्नी निहारिका हिनेच ही हत्या केल्याचं उघड झालं. 

निहारिकासोबत तिचा प्रियकर निखिल आणि दुसरा आरोपी अंकुर याने हत्येचा कट रचला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. यावेळी लाल रंगाच्या मर्सिडीज बेंझने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही कार रमेशच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं आढळून आलं. या कारच्या मदतीने पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावणं सहज शक्य झालं.

रमेशच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांचा तपास जसजसा पुढे जात होता. तसा तिच्या भूमिकेवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे निहारिकाला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तिने प्रियकर निखिल आणि अंकुर यांच्यासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं सांगितलं. 

हरियाणात राहत असताना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात निहारिकाला जेलमध्ये जावं लागलं होतं. जेलमध्ये तिची अंकुरशी भेट झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर निहारिकाने रमेशशी लग्न केलं. हे तिचं दुसरं लग्न होतं. रमेशसोबत लग्न झाल्यानंतर निहारिकाचं नशीब फळफळलं.

एके दिवशी तिने पतीकडे आठ कोटी रुपये मागितले. रमेशने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे निहारिकाला राग आला. निहारिकाचे निखिलसोबत अफेअर होते. रमेशची मालमत्ता हडप करण्यासाठी तिने हत्येचा कट रचला. १ ऑक्टोबर रोजी या व्यावसायिकाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर, निहारिका ८०० किमीपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या कोडागु येथे गेली आणि कॉफीच्या मळ्यात मृतदेहाची विल्हेवाट लावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस