औरंगाबाद - देशी, विदेशी दारू दुकानाचा परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५० लाखाची फसवणूक केल्याच्या गुंह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या व्यापाऱ्याला सिडको पोलिसांनी दिल्लीतून अटक करुन आणले. न्यायालयाने त्याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
दयानंद वजलू वनंजे ( ४८, रा. अकलूज, ता. बिलोली, नांदेड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या विलास चव्हाण यांच्या तक्रारीवरुन गतवर्षी सिडको पोलिस ठाण्यात आरोपी वनंजेसह अन्य आरोपीविरूध्द गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून तो पोलिसांना चकमा देत होता. वनंजे हा दिल्लीत सोन्या चांदीचे दुकान चालवित असल्याची पक्की माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली. यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे , सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाटील , कर्मचारी नरसिंग पवार आणि कैलास जायभाये यांना दिल्लीला रवाना केले. या पथकाने त्याचा कसून शोध घेतला तेव्हा संशयित आरोपी तोंडाला मास्क लावून रिक्षातून उतरत असल्याचे पोलिसांना दिसताच त्यांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पक्डले. यावेळी पोलिसांनी ओळखपत्र दाखवून त्याला ताब्यात घेतले आणि पटेलनगर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याच्या अटकेची नोंद करून तेथील न्यायालयाकडुन आरोपीला औरंगाबादला आणण्याची परवानगी घेतली. काल त्याला औरंगाबादला आणण्यात आले. आरोपीला आज येथील न्यायालयासमोरहजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती