बस वळविण्याच्या कारणावरून बस चालकाला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:18 IST2018-10-15T18:36:33+5:302018-10-15T19:18:14+5:30
याप्रकरणी मुजोर दोन दुचाकीस्वारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

बस वळविण्याच्या कारणावरून बस चालकाला बेदम मारहाण
मुंबई - घाटकोपरच्या मजास आगार परिसरातील सीप्झ मार्गावर बेस्ट बस चालकाला अज्ञात दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ज्ञानदेव शेळके असं जखमी बेस्ट बस चालकाचं नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी मुजोर दोन दुचाकीस्वारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कुरणे चौक ते सीप्झ बस थांब्यादरम्यान शेळके बेस्ट बस चालवत होते. दरम्यान सीप्झ बस थांब्यावर त्यांची बस येत असताना एका डाव्या वळणावर शेळके यांनी बस वळवली. मार्ग अरूंद असल्यामुळे मागून येणाऱ्या चार ते पास दुचाकीस्वारांना पुढे जाता आलं नाही. यावरूनच त्यांनी बेस्ट बस अडवत बसमध्ये घुसून शेळके यांना मारहाण केली. या मारहाणीत शेळके यांच्या कपाळाला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. त्यावेळी घटनास्थळी गर्दी होऊ लागल्याने आरोपींना घटनास्थळाहून पळ काढला. शेळके यांना उपचारासाठी तातडीने ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले असून शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आणि तात्काळ पोलिसांनी कारवाई करत त्याचदिवशी मारहाण करणाऱ्या मुजोर दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली.