सत्यम पार्क येथे घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास

By सागर दुबे | Updated: April 28, 2023 16:00 IST2023-04-28T15:59:43+5:302023-04-28T16:00:01+5:30

याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Burglary at Satyam Park; Cash Lumpas with Jewellery | सत्यम पार्क येथे घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास

सत्यम पार्क येथे घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव :  आव्हाणे शिवारातील सत्यम पार्क येथील अशोक सुरेश जोहरे याचे बंद घर चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ७२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अशोक जोहरे हे रविवारी दुपारी घराला कुलूप लावून कुटूंबासह बाहेर गावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूप बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. 

गुरूवारी सकाळी ११ वाजता जोहरे हे घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला तर घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तसेच ३२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रूपयांची रोकड गायब झालेली दिसून आली. त्यांनी लागलीच तालुका पोलिस गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागेल असे काहीही मिळून आले नाही. त्यानंतर जोहरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संजय भालेराव करीत आहेत.
 

Web Title: Burglary at Satyam Park; Cash Lumpas with Jewellery