घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; एक लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:43 IST2023-04-05T15:43:02+5:302023-04-05T15:43:21+5:30

खदान पोलिसांची कारवाई एका विधी संघर्ष बालकाला मलकापूरातून परिसरात ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

Burglar arrested; One lakh 8 thousand worth of goods seized | घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; एक लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; एक लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोला: शहरातील कोठारी वाटिका क्रमांक आठ खडकी येथे झालेल्या घरफोडीमध्ये खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक मोटर सायकल सोन्याचा मुद्देमाल असा एकूण एक लाख आठ हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले.

कोठारी वाटिका क्रमांक आठ खडकी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातून  सोन्याचे साहित्य, मोटारसायकल असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फिर्यादी शीतल प्रल्हाद पाखरे 35 रा. कोठारी वाटिका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवी 380 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून आरोपी नितेश अमर गिरी 19 रा. मलकापूर व एका विधी संघर्ष बालकाला मलकापूरातून परिसरात ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीच्या ताब्यातून 17 हजार 400 रुपयांची सोन्याची काळी पोत, 35 हजार 960 रुपयांची सोन्याची लगड, 55 हजाराची एमएच 04- 1501 अशी मोटरसायकल असा एकूण 1 लाख 8 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात डिगांबर अरखराव, विजय चव्हाण, नितीन मगर, रवी डाबेराव, रोहित पवार, संदीप ताले, आकाश राठोड आदींनी केली.

Web Title: Burglar arrested; One lakh 8 thousand worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.