धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणारे बंटी बबली अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:50 IST2019-05-02T14:46:28+5:302019-05-02T14:50:00+5:30
दोघे पालघर, विरार येथील रहिवासी आहेत.

धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणारे बंटी बबली अटकेत
ठळक मुद्देबंटी- बबलीला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ईर्शाद उर्फ इशू समशेर खान (26) आणि त्याची पत्नी हिना असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
ठाणे - मिरारोड, भाईंदर परिसरात स्कूटरवरुन येत धूम स्टाइलने महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या बंटी- बबलीला ठाणे ग्रामीण पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणून त्यातील 4 लाख 20 हजारांचे 143 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच गुन्हयातील 50 हजार किंमतीची गाडी हस्तगत करण्यात आली आहे. ईर्शाद उर्फ इशू समशेर खान (26) आणि त्याची पत्नी हिना असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ईर्शाद हा सराइत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघे पालघर, विरार येथील रहिवासी आहेत.