शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 2:21 PM

Bulli Bai App: भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुंबई : मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. ३१ डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.  उत्तराखंडमधून श्वेता सिंगसह उत्तराखंडमधील आणखीन एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामागे नेमके कोण आहे याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. 

भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या  ॲपचे फक्त 5 फॉलोवर्स असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. तिसरा आरोपी मयांक रावत याला याच प्रकरणात उत्तराखंड येथून अटक केली आहे. तेथील पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता केलेले स्टेटमेंटही चुकीचे आहे असं देखील हेमंत नगराळे पुढे म्हणाले आहेत. 

सिटी एसपी ममता बोहरा म्हणाल्या की, “मुंबई पोलिसांनी आक्षेपार्ह अॅप चालवल्याबद्दल आदर्श कॉलनीतून महिलेला अटक केली. या महिलेने आता आपला गुन्हा कबूल केला आहे.या प्रकरणातील ही दुसरी अटक होती. यापूर्वी, मंगळवारी बंगळुरू येथून 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. दोघेही या प्रकरणातील आरोपी असून एकमेकांना ओळखतात. ते फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. ही महिला बुल्लीबाई अॅप वादाशी संबंधित तीन खाती हाताळत होती.

 काय आहे प्रकरण?

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन Appवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील केली होती.

असा झाला खुलासा...१ जानेवारी रोजी जेव्हा अनेक मुस्लिम महिलांनी त्यांचा फोटो बुल्ली अ‍ॅपवर अपलोड झालेला पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. GitHub प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार सुरू होता. विशेषत: यात मुस्लिम महिलांना लक्ष्य केलं जात होतं. ज्या महिला सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असतात अशा महिलांना लक्ष्य करुन त्यांच्यावर बोली लावण्याचा प्रकार बुल्ली बाई अ‍ॅपवर सुरू होता. यात महिला पत्रकार, कायकर्ता आणि वकील यांना लक्ष्य केलं जात होतं. याआधी सुल्ली डील्स नावाचं अ‍ॅप देखील सुरू होतं. बुल्ली अ‍ॅप हे त्याच अ‍ॅपचं दुसरं रूप होतं. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईUttarakhandउत्तराखंडBengaluruबेंगळूरcommissionerआयुक्तHemant Nagraleहेमंत नगराळे