Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:21 PM2022-01-05T14:21:15+5:302022-01-05T16:03:45+5:30

Bulli Bai App: भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Bulli Bai App: Three arrested in 'Bulli Bai' case, Mumbai Police Commissioner appeals | Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं

Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं

Next

मुंबई : मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. ३१ डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.  उत्तराखंडमधून श्वेता सिंगसह उत्तराखंडमधील आणखीन एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामागे नेमके कोण आहे याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. 

भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या  ॲपचे फक्त 5 फॉलोवर्स असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. तिसरा आरोपी मयांक रावत याला याच प्रकरणात उत्तराखंड येथून अटक केली आहे. तेथील पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता केलेले स्टेटमेंटही चुकीचे आहे असं देखील हेमंत नगराळे पुढे म्हणाले आहेत. 

सिटी एसपी ममता बोहरा म्हणाल्या की, “मुंबई पोलिसांनी आक्षेपार्ह अॅप चालवल्याबद्दल आदर्श कॉलनीतून महिलेला अटक केली. या महिलेने आता आपला गुन्हा कबूल केला आहे.
या प्रकरणातील ही दुसरी अटक होती. यापूर्वी, मंगळवारी बंगळुरू येथून 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. दोघेही या प्रकरणातील आरोपी असून एकमेकांना ओळखतात. ते फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. ही महिला बुल्लीबाई अॅप वादाशी संबंधित तीन खाती हाताळत होती.

 काय आहे प्रकरण?

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन Appवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील केली होती.

असा झाला खुलासा...
१ जानेवारी रोजी जेव्हा अनेक मुस्लिम महिलांनी त्यांचा फोटो बुल्ली अ‍ॅपवर अपलोड झालेला पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. GitHub प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार सुरू होता. विशेषत: यात मुस्लिम महिलांना लक्ष्य केलं जात होतं. ज्या महिला सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असतात अशा महिलांना लक्ष्य करुन त्यांच्यावर बोली लावण्याचा प्रकार बुल्ली बाई अ‍ॅपवर सुरू होता. यात महिला पत्रकार, कायकर्ता आणि वकील यांना लक्ष्य केलं जात होतं. याआधी सुल्ली डील्स नावाचं अ‍ॅप देखील सुरू होतं. बुल्ली अ‍ॅप हे त्याच अ‍ॅपचं दुसरं रूप होतं. 

Web Title: Bulli Bai App: Three arrested in 'Bulli Bai' case, Mumbai Police Commissioner appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.