शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

येरवड्यात जागा बळकावण्यासाठी बिल्डरने रोखले पिस्तुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 20:34 IST

पिस्तूलाचा धाक दाखवून गोडाऊन आणि कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करून जागा बळकावल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेरवडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल

पुणे : पिस्तूलाचा धाक दाखवून गोडाऊन आणि कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करून जागा बळकावल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद जैन असे बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी विकास भिमसेन नाणेकर (वय ४२, रा. चंदननगर रोड) यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या वडिलांनी १९७३ साली नगररोड येथे ५००० चौरस फुट जागेत भुषण कडबाकुट्टी व १९७७ मध्ये भूषण फायरवूड अ‍ॅण्ड स्क्रॅप सेंटर नावाचा व्यवसाय केला. या दोन्ही दुकानांची जागा भाड्याने घेतलेली होती. फिर्यादींच्या वडिलांनी २००४ आजारपणामुळे कडबाकुट्टीचा व्यवसाय बंद केला होता. तर २००४ त २००७ दरम्यान भंगार व्यवसायाच्या परवान्याचे नूतनीकरण केले. या ठिकाणी २००८ मध्ये भूषण फ्रेम नावाने दुकान सुरू करण्यात आले होते. २०१७ साली वडिलांचा मृत्यू झाल्यावर भंगाराचा व्यवसायही फिर्यादी पाहत होत. २५ सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादींचा पुतण्या भुषण हा त्याचा मामा सुधीर साकोरे यांच्याकडे रामवाडी येथे जेवायला गेला होता. यानंतर तो रात्री फेरफटका मारण्यासाठी नगररोड येथे आला. त्यावेळी त्याला दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्याला पत्र्याचे गेट लावून रस्ता अडवलेला दिसला. त्यामुळे तो दुकानाकडे गेला असता तेथे दुकानाचे कुलूप तोडण्याचे काम सुरू होते. तसेच जेसीबीने गोडाऊन तोडून आतील सर्व सामान टेम्पोत भरून चोरण्यात आले. यासंदर्भात तेथे उपस्थित असलेल्या जैन यांना विचारले असता त्यांनी पिस्तूल रोखून चल येथून बाहेर निघ असा दम दिला. तर रमेश आढाव, शाम आढाव गुंड मोईन कुरेशी यांना पुतण्याला येथून बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर हे सर्व हत्यार घेऊन पुतण्याच्या दिशेने धावुन आले. त्यामुळे भूषण यांनी पळ काढून घर गाठले. दूसऱ्या दिवशी तेथे जाऊन पाहणी केली असता गोडाऊन व कार्यालय जमीनदोस्त झाल्याचे आढळले. त्यामुळे येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल केला. यानंतर १२ आॅक्टोबर रोजी फिर्यादी पुन्हा व्यवसायाच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेले असता पाच ते सहा व्यक्तींनी धक्का-बुक्की करून त्यांच्यावर गज घेऊन धावले, अशी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी