माटुंग्यात नैराश्यातून बिल्डरने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 19:16 IST2019-07-10T19:14:25+5:302019-07-10T19:16:46+5:30
याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माटुंग्यात नैराश्यातून बिल्डरने केली आत्महत्या
मुंबई - ५६ वर्षीय मुकेश सावला यांनी माटुंगा येथे राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आज दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास मुकेश सावला यांनी आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माटुंगा पूर्व येथील लक्ष्मी निकेतन इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोइटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात सावला हे नैराश्येत होते असल्याचं निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी सुसाईट नोट सापडलेली नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.
मुंबई - ५६ वर्षीय मुकेश सावला यांनी माटुंगा येथे राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या https://t.co/thzM8ylhGc
— Lokmat (@MiLOKMAT) July 10, 2019