BSF has seized 5 pakistani boats near Gujarat border; Suspected terrorist fatalist | गुजरात सीमेनजीक ५ पाकिस्तानी नौका केल्या जप्त; दहशतवादी घातपाताचा संशय

गुजरात सीमेनजीक ५ पाकिस्तानी नौका केल्या जप्त; दहशतवादी घातपाताचा संशय

ठळक मुद्देकाल रात्री १०.४५ ही कारवाई करण्यात आली. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. गुजरातमध्ये या नौका सापडल्याने खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली -  सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुजरात सीमेनजीक ५ पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. अलीकडेच गुप्तचर विभागाने सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. काल गुजरातमध्ये या नौका सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये भारत- पाक सीमेजवळ असणाऱ्या हरामी नाला परिसरातून या ५ नौका जप्त करण्यात आल्या आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. काल रात्री १०.४५ ही कारवाई करण्यात आली. अद्याप काही संशयित गोष्ट तपासात आढळून आलेली नाही. 

Web Title: BSF has seized 5 pakistani boats near Gujarat border; Suspected terrorist fatalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.