The brutal murder of a young man who went to settle a quarrel, the incident in Chembur Park | भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या, चेंबूर पार्कमधील घटना

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या, चेंबूर पार्कमधील घटना

मुंबई : मित्राला मारहाण करणाऱ्यांपासून वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री चेंबूर येथील हॉटेल अँब्राँलजवळील नॅशनल हायस्कूल समोर घडली. अक्षय राजू देसाई (२३, रा. टिळकनगर) असे हत्या झालेल्याचे नाव असून चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली.
अमर सुशील सिंग (२०, रा. टिळकनगर), अजय धर्मालिंगम स्वामी (२९, रा. टिळकनगर), रमण गोविंदराज शेट्टी (२२, रा. मीरा रोड) व विशाल बाळू जाधव उर्फ गोट्या (२२, रा. टिळकनगर) अशी अटक आराेपींची नावे आहेत. यापैकी अजय स्वामी हा वाॅचमनचे काम करीत असून अन्य तिघे बेराेजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अक्षय हा शुक्रवारी रात्री त्याचा भाऊ आदित्य व मित्र विक्की शेजुळ यांच्याबरोबर पायी जात होता. त्यावेळी हायस्कूलसमोर त्याचा मित्र गणेश लोकरे याच्याबरोबर आर्थिक देवाणघेवाणीवरून अमरसिंग व अन्य तिघे जण त्याला मारहाण करीत असल्याचे दिसले. 
अक्षय व दोघांनी त्याला साेडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. अमर सिंगने त्याच्याकडील 
चाकूने अक्षयवर वार केले. तो 
रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांनी पळ काढला हाेता. यात अक्षयचा मृत्यू झाला.

Web Title: The brutal murder of a young man who went to settle a quarrel, the incident in Chembur Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.