तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या, आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 17:52 IST2020-11-15T17:51:11+5:302020-11-15T17:52:23+5:30
Kalyan Crime News : पहिल्या पत्नीशी असलेले प्रेमसंबंध आणि जून्या वादातून संजय गवळी या ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून दिपक मोरे या ३० वर्षीय तरुणाने निर्घृण हत्या केली.

तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या, आरोपी अटकेत
डोंबिवली - पहिल्या पत्नीशी असलेले प्रेमसंबंध आणि जून्या वादातून संजय गवळी या ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून दिपक मोरे या ३० वर्षीय तरुणाने निर्घृण हत्या केल्याची घटना डोंबिवली पुर्वेतील आयरेगाव परिसरातील ज्योतीनगर झोपडपट्टीत घडली. याप्रकरणी दिपकला अटक करण्यात आल्याची माहिती वपोनी सचिन सांडभोर यांनी दिली. ही घटना शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. मयत आणि आरोपी दोघेही क्रिमिनल असून त्यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सांडभोर यांनी दिली