Crime news in Nagpur: पाचपावलीत तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:17 IST2021-05-28T22:16:39+5:302021-05-28T22:17:03+5:30
आरोपी फरार, परिसरात प्रचंड तणाव. घटनास्थळी मोठ्या संख्येत संतप्त जमाव जमला. त्यांचा रोष लक्षात घेता परिस्थिती चिघळू शकते, असा अंदाज आल्याने पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली.

Crime news in Nagpur: पाचपावलीत तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी रात्री पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात एका तरुणाची काही गुंडांनी विटांनी ठेचून भीषण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, मृताचे नाव कपिल शशिकांत बेन (वय २०) असून तो मोमीनपुर्या नजीकच्या योगा कंपनी जवळ राहत होता. आज रात्री ७ च्या सुमारास तो काही मित्रांसोबत लष्करिबाग परिसरात गेला होता. तेथे त्याचा काही जणांसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी विटांनी ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
घटनास्थळी मोठ्या संख्येत संतप्त जमाव जमला. त्यांचा रोष लक्षात घेता परिस्थिती चिघळू शकते, असा अंदाज आल्याने पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली. दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर या गुन्ह्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. घटनेची माहिती कळताच पाचपावलीचा पोलिस ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी तसेच गुन्हे शाखेची पथके, दंगा प्रतिबंधक पथक घटनास्थळी पोहोचले संतप्त जमाव घोषणाबाजी करीत असल्याचे बघून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावं आणि संख्या कळू शकली नाही.