भोसरीत महिलेची निर्घृण हत्या; शहरात खुनाचे सत्र सुरूच...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:35 PM2021-09-25T23:35:54+5:302021-09-25T23:36:21+5:30

crime news : कलावती धोंडीबा सुरवार (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.

Brutal murder of a woman in Bhosari; Murder season continues in the city ... | भोसरीत महिलेची निर्घृण हत्या; शहरात खुनाचे सत्र सुरूच...

भोसरीत महिलेची निर्घृण हत्या; शहरात खुनाचे सत्र सुरूच...

Next

पिंपरी : शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. धारदार शस्त्राने वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. धावडे वस्ती, भोसरी येथे शनिवारी (दि. २५) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

कलावती धोंडीबा सुरवार (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून त्या मुलासह धावडेवस्ती येथे राहत होत्या. दरम्यान, शनिवारी रात्री सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला. खुनाचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गणेश विसर्जनानंतर सात खून
गणेश विसर्जन झाल्यानंतर पिंपरी - चिंचवड शहरात सोमवारी (दि. २०) खुनाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रोज खुनाच्या घटना उघडकीस येत आहेत. खुनाची ही मालिका थांबताना दिसत नाही. सोमवारपासून उघडकीस आलेला हा सातवा खून आहे. खुनाच्या सत्रामुळे शहर हादरले आहे.

Web Title: Brutal murder of a woman in Bhosari; Murder season continues in the city ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app