अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:41 IST2026-04-12T14:41:24+5:302026-04-12T14:41:35+5:30
अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात एका २२ वर्षीय युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात एका २२ वर्षीय युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे.
शनिवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही घटना घडली. संतोष राजू बन (वय २२ वर्षे), राहणार कपिलवस्तू नगर, असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
गाडगे नगर पोलीस आणि डीबी पथकाने तत्परता दाखवत तपास चक्रे फिरवली आणि अवघ्या काही वेळातच तिघांना ताब्यात घेतले. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी मृताच्या चुलतभावाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी पाच ते सहा जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.