गरम चपात्या वाढल्या नाही म्हणून सासूची निर्घृण हत्या; मध्य प्रदेशातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:07 IST2020-05-21T02:58:16+5:302020-05-21T07:07:31+5:30
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील मंधाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिल्लोरा गावाजवळील जंगलात ही घटना घडली.

गरम चपात्या वाढल्या नाही म्हणून सासूची निर्घृण हत्या; मध्य प्रदेशातील घटना
खंडवा (मध्यप्रदेश) : गरम चपात्या वाढल्या नाही, म्हणून एका जावयाने आपल्या ५५ वर्षीय सासूला बेदम मारहाण करून ठार केले. पोलिसांनी सुरेश (३५) या जावयाला अटक केली आहे. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील मंधाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिल्लोरा गावाजवळील जंगलात ही घटना घडली.
हा जावई लग्नानंतर सासुरवाडीतच राहत होता. सुरेश हा रात्री उशिरा घरी परत आला. पत्नी झोपलेली असल्यामुळे सासू गुजरबाई यांनी त्याला जेवायला वाढले. यावेळी सुरेशने आपल्या सासूला गरम चपात्या वाढण्यास सांगितले. रात्री इतक्या उशिरा गरम चपात्या वाढणे शक्य नसल्याचे सासूने सांगितल्यामुळे सुरेश चिडला. त्याने एक काठी घेऊन सासूला मारायला सुरुवात केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरेश पळून गेला.