एक्स- गर्लफ्रेन्डला जिवंत सुटकेसमध्ये टाकून मग जंगलात फेकून आला होता; आता मिळाली शिक्षा....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:32 PM2021-09-27T17:32:19+5:302021-09-27T17:35:03+5:30

वॅलरी आणि जेविअर यांच्यात मैत्री होती. पण काही कारणावरून दोघे वेगळे झाले होते. अशात एख दिवस जेविअर वॅलेरीच्या घरी गेला आणि तिथे दोघांमध्ये भांडण झालं.

Brutal murder of ex girlfriend man stuffs girl in suitcase leaves her to suffocate 30 years jail punishment | एक्स- गर्लफ्रेन्डला जिवंत सुटकेसमध्ये टाकून मग जंगलात फेकून आला होता; आता मिळाली शिक्षा....

एक्स- गर्लफ्रेन्डला जिवंत सुटकेसमध्ये टाकून मग जंगलात फेकून आला होता; आता मिळाली शिक्षा....

Next

एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत क्रूरतेची सीमा पार केली. या अमेरिकन तरूणाने आधी तर तिला बेदम मारहाण केली नंतर तिला जिवंत सुटकेसमध्ये भरलं आणि सुटकेस जंगलात फेकून आला. ज्यामुळे सुटकेसमध्ये श्वास गुदमरून तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कोर्टाने तरूणाला कठोर शिक्षा सुनावली.

मीडिया रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कच्या क्वींसमध्ये एक बॉयफ्रेन्ड इतका चिडला की, त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डचा जीव घेतला. या केसमध्ये २६ वर्षीय जेविअर डी सिल्वा रोजासला कोर्टाने ३० वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. जेविअरने आपल्या २४ वर्षीय एक्स-गर्लफ्रेन्ड वॅलेरी रेयेसची २०१९ मध्ये हत्या केली होती. या प्रकरणाची आता सुनावणी झाली असून तरूणाला शिक्षा झाली आहे.

असं सांगण्यात आलं की, वॅलरी आणि जेविअर यांच्यात मैत्री होती. पण काही कारणावरून दोघे वेगळे झाले होते. अशात एख दिवस जेविअर वॅलेरीच्या घरी गेला आणि तिथे दोघांमध्ये भांडण झालं. यादरम्यान जेविअरने वॅलेरीच्या डोक्यावर हल्ला केला. त्यामुळे तिला डोक्यावर गंभीर मार लागला. वॅलरी चेहऱ्यावरही गंभीर जखम झाली होती. पण तो इतक्यावरच थांबला नाही.

जेविअरने वॅलरीचे हात-पाय बांधले आणि तिच्या तोंडावर टेप लावला. त्यानंतर तिला एक सुटकेसमध्ये भरलं. ही सुटकेस कारमधून तो २० किलोमीटर दूर घेऊन गेला आणि जंगलात फेकून आला. 

पोलिसांनुसार, तरूणीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाला. कारण जेविअरने तिला जिवंतच सुटकेसमध्ये टाकलं होतं. दोन दिवसांनी जेव्हा तरूणीच्या परिवाराने तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी जेविअरची चौकशी केली. तेव्हा हा सगळा खुलासा झाला. तरूणीचा मृतदेह एक आठवड्यानंतर जंगलातून सापडला. 

चौकशी दरम्यान समोर आलं की, हत्येनंतर जेविअरने वॅलरीचा लॅपटॉप आणि तिचं डेबिट कार्ड चोरी केलं होतं. त्याने तरूणीच्या खात्यातू ४ लाख रूपयेही काढले होते. पोलिसांनी जेविअरला अटक करून कोर्टात हजर केलं. २३ सप्टेंबरला कोर्टाने त्याला  ३० वर्षांची शिक्षा सुनावली. 
 

Web Title: Brutal murder of ex girlfriend man stuffs girl in suitcase leaves her to suffocate 30 years jail punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app