शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून मुलाची निर्घृण हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 10:00 IST

गंभीर जखमी झालेल्या नदीम शहा याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला: किरकोळ वादातून अल्पवयीन मुलावर धारदार चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना १९ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पातूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडीत तर एका अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयात पाठविण्याचा आदेश दिला.पातुरातील मुजावर पुरा येथे राहणारा एजाज शहा अयुब शहा (२६) याच्या तक्रारीनुसार आरोपींनी दुचाकीची सीटकव्हर फाडल्यामुळे त्याचा भाऊ नदीम शहा नयुम शहा (१७) याने जाब विचारला असता, वाद होऊन वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी शेख जुबेर शेख दस्तगीर कुरेशी (२१), शेख दस्तगीर शेख शेरू (४५), शेख शारिक शेख कयुम कुरेशी (३६) आणि एक १७ वर्षीय आरोपी (सर्व रा. कुरेशी पुरा) अशा चौघांनी अशफाक मेंबर यांच्या घरासमोर येऊन नदीम शहा (१७) याच्या मांडीवर, जांघेवर चाकूने वार करून त्यास जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या नदीम शहा याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. एजाज शहा याच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२, ५0४(३४) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपी शेख जुबेर, शेख दस्तगीर, शेख शारिक यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही २३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी