किरकोळ वादातून मुलाची निर्घृण हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 10:00 IST2020-05-21T09:59:48+5:302020-05-21T10:00:03+5:30

गंभीर जखमी झालेल्या नदीम शहा याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Brutal murder of a child over a minor dispute! | किरकोळ वादातून मुलाची निर्घृण हत्या!

किरकोळ वादातून मुलाची निर्घृण हत्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला: किरकोळ वादातून अल्पवयीन मुलावर धारदार चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना १९ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पातूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडीत तर एका अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयात पाठविण्याचा आदेश दिला.
पातुरातील मुजावर पुरा येथे राहणारा एजाज शहा अयुब शहा (२६) याच्या तक्रारीनुसार आरोपींनी दुचाकीची सीटकव्हर फाडल्यामुळे त्याचा भाऊ नदीम शहा नयुम शहा (१७) याने जाब विचारला असता, वाद होऊन वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी शेख जुबेर शेख दस्तगीर कुरेशी (२१), शेख दस्तगीर शेख शेरू (४५), शेख शारिक शेख कयुम कुरेशी (३६) आणि एक १७ वर्षीय आरोपी (सर्व रा. कुरेशी पुरा) अशा चौघांनी अशफाक मेंबर यांच्या घरासमोर येऊन नदीम शहा (१७) याच्या मांडीवर, जांघेवर चाकूने वार करून त्यास जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या नदीम शहा याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. एजाज शहा याच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२, ५0४(३४) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपी शेख जुबेर, शेख दस्तगीर, शेख शारिक यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही २३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)

Web Title: Brutal murder of a child over a minor dispute!