भीषण! भयंकर!! भयानक!!! डोळा काढला, बोटं चिरडली; ८ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:04 IST2021-08-05T15:02:50+5:302021-08-05T15:04:42+5:30
संपूर्ण गावात संतापाचं वातावरण; मृत मुलीच्या कुटुंबाचा आक्रोश

भीषण! भयंकर!! भयानक!!! डोळा काढला, बोटं चिरडली; ८ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या
मुंगेर: बिहारच्या मुंगेरमध्ये एक अतिशय भीषण घटना घडली आहे. एका ८ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकत होती. बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचा खून करण्यात आला. तिचा उजवा डोळा काढण्यात आला. त्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बिहारच्या मुंगेरी जिल्ह्यातल्या सफियाबाद ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण प्रकार घडला आहे. गंगा नदीत मासेमारी करणाऱ्या जतन चौधरी (नाव बदलण्यात आलंय) यांची मोठी मुलगी अल्पना कुमारीचा (नाव बदलण्यात आलंय) मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत गुरुवारी आढळून आला. उपेंद्र यादव यांच्या वीटभट्टीजवळ पीडितेचा मृतदेह सापडला.
बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची ओळख पटू नये यासाठी तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृतदेहाचा उजवा डोळा काढण्यात आला. मृतदेहाच्या दोन्ही हातांची बोटं चिरडण्यात आली. 'पीडिता दुपारी १ वाजता वडिलांसोबत गंगा घाट परिसरात आली होती. तिचे वडील मासेमारी करण्यासाठी नदीत गेले. त्यानंतर ती घराकडे निघाली. मात्र बराच वेळ घराकडे न परतल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. आज सकाळी तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला,' अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.