मुंबई - भाऊ आणि वहिनी सतत अपमान करत असल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरुने स्वतःच्या सख्या पुतण्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापकरणी शिवाजी नगर पोलिसांनी नौशाद अन्सारी (२२) याला अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. नौशाद हा मुळचा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. तो गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे उठल्या बसल्या अपमानास्पद वागणूक देत. मुंबईत आल्यानंतर तो जरीचे काम करुन कमावलेले पैसे भाऊ आणि वहिनीला देत होता. मात्र, भाऊ आणि वहिनी त्याचा सातत्याने अपमान करीत तसेच त्याला चांगले खायला देत नव्हते. यामुळे नौशाद आयुष्याला वैतागला होता. अशातच त्याने भावाचा मुलगा सात वर्षाच्या मुलाला खाऊ देतो असे सांगत गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात नेले. या ठिकाणी त्याने बिअरच्या बाटली फोडून मुलाच गळा चिरला. त्यानंतर बराच वेळ मृतदेह तसाच बेवारसरित्या टाकुन तो निघुन गेला. दुसरीकडे मुलगा हरविल्याचे समजताच नौशादचा भाऊ आणि वाहिनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाला होता. यामुळे याचा पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, या मुलाला नौशादबरोबर पाहिल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी नौशादला ताब्यात घेत कसुन चौकशी केली असता त्यानेच या हत्येची कबुली दिली. तर पोलिसांनी तात्काळ या माथेफिरुला अटक करीत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.
भाऊ - वहिनीने अपमान केल्याने संतापला, रागाच्या भरात पुतण्याचा गळा चिरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:04 IST
यापकरणी शिवाजी नगर पोलिसांनी नौशाद अन्सारी (२२) याला अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाऊ - वहिनीने अपमान केल्याने संतापला, रागाच्या भरात पुतण्याचा गळा चिरला
ठळक मुद्देनौशाद हा मुळचा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. तो गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे उठल्या बसल्या अपमानास्पद वागणूक देत. बिअरच्या बाटली फोडून मुलाच गळा चिरला. त्यानंतर बराच वेळ मृतदेह तसाच बेवारसरित्या टाकुन तो निघुन गेला.