Brother in law from Mumbai killed his sister's husband | मुंबईहून आलेल्या मेव्हूण्याने केला भावोजीची हत्या

मुंबईहून आलेल्या मेव्हूण्याने केला भावोजीची हत्या

ठळक मुद्देगजानन राजूसिंग राठोड (४५) रा. आरंभी असे आरोपीचे नाव आहे.

दिग्रस (यवतमाळ) : किरकोळ वादातून चुलत मेव्हण्याने जवयाचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता तालुक्यातील आरंभी येथे घडली. रामेश्वर प्रेमसिंग पवार (३०) रा. आरंभी असे मृतकाचे नाव आहे. तर गजानन राजाराम राठोड, असे मारेकऱ्याचे नाव आहे.


रामेश्वर व गजाननचा किरकोळ कारणातून वाद झाला होता. यात रामेश्वरने गजाननला शिवीगाळ केल्यामुळे गजाननला आपला अपमान असह्य झाला. त्याचा मुलगा योगेशला सोबत घेऊन तो रामेश्वरचा शोध घेत असताना गावातील एका दुकानाजवळ रामेश्वर उभा असलेला दिसला. तेव्हा हातात असलेली सेंट्रिंगची पाटी रामेश्वरच्या डोक्यावर टाकली. यात तो गंभीर जखमी झाला. रामेश्वरच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे आणले. मात्र रामेश्वरचा रस्त्यात मृत्यू झाला. मृतकाचा चुलतभाऊ भारत बद्री पवार रा. आरंभी यांनी दिग्रस पोलिसांत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून गजानन राजाराम राठोड, दीपक राजाराम राठोड, योगेश गजानन राठोड रा. आरंभी यांना अटक केली. यातील आरोपी माणिक राजाराम राठोड हा फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. रामेश्वरच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, वडील असा आप्त परिवार आहे.

Web Title: Brother in law from Mumbai killed his sister's husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.