शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

गरोदर बहिणीचे कापलेले शिर घेऊन भाऊ घराबाहेर पडला अन् म्हणाला गुन्ह्यांची शिक्षा दिली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:34 IST

Murder Case : या संपूर्ण घटनेची आणखी एक वेदनादायक बाब म्हणजे हत्येच्या वेळी अल्पवयीनसोबत त्याची आईही उपस्थित होती आणि तिनेही आपल्या मुलीच्या हत्येत मुलाला साथ दिली. आरोपी आईला सोमवारी न्यायालयात पोलीस कोठडी सुनावली असून एक विधिसंघर्षग्रस्त बालकास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले.

वैजापूर : गाेयगावात रविवारी झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे पूर्ण जिल्हा हादरून गेला. १९ वर्षीय मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याने आईसह भावाने तिचे शिर धडावेगळे करून स्वत: पोलीस ठाण्यात आरोपी हजर झाले होते. गरोदर बहिणीची हत्या करून भाऊ शिर घेऊन घराबाहेर पडला आणि जोरजोरात ओरडत तो गावकऱ्यांना सांगू लागला की, त्याने आपल्या बहिणीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा दिली आहे. या संपूर्ण घटनेची आणखी एक वेदनादायक बाब म्हणजे हत्येच्या वेळी अल्पवयीनसोबत त्याची आईही उपस्थित होती आणि तिनेही आपल्या मुलीच्या हत्येत मुलाला साथ दिली. आरोपी आईला सोमवारी न्यायालयात पोलीस कोठडी सुनावली असून एक विधिसंघर्षग्रस्त बालकास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले. हा सर्व घटनाक्रम थोरे आणि मोटे या परिसरातील जुन्या वादातून घडला असल्याची माहिती पुढे आली आहे.

मयत कीर्ती उर्फ किशोरी (दि.२१) हिने सहा महिन्यांपूर्वी आपल्याच गावातील अविनाश थोरे या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. त्यावेळी कीर्तीला ठार मारण्याची धमकी तिच्या परिसरातील सदस्यांनी दिली होती. प्रेमविवाहास मुलीच्या परिसराकडून विरोध असल्याने काही दिवस बोलणे बंद होते. मुलीने चुकीचा निर्णय घेतल्याने आपली गावात, नातेवाइकांत बदनामी केल्याची सल कीर्तीच्या आई-वडिलांच्या मनात कायम होती. त्यामुळे कीर्तीला तिच्या आईने विश्वासात घेत तिच्या घरी येणे-जाणे वाढले. यादरम्यान रविवारी (दि. ५) कीर्तीची आई शोभा संजय मोटे हिने एकाच्या साथीने कीर्तीच्या घरी येत तिचा निर्घृण खून करत शीर धडावेगळे केल्याची घटना रविवारी दुपारी पुढे आली होती.

कीर्तीला घेऊन दिली होती बुलेटकीर्ती महाविद्यालयीन युवती असल्याने तिला वैजापूरला जाण्या-येण्यासाठी वडील संजय मोटे यांनी बुलेट घेऊन दिली होती. यावरूनच कीर्ती महाविद्यालयात येत-जात असल्याची माहिती पुढे आली आहे. कीर्तीचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात करण्याची वडिलांची इच्छा होती. परंतु, तिने प्रेमविवाह केल्याने त्यांच्या सर्व इच्छा मारल्या गेल्याची सल वडील संजय मोटे यांच्यासह परिसरातील सदस्यांत निर्माण झाली होती.कीर्तीवर सासरी अंत्यसंस्कारकीर्तीवर सोमवारी दुपारी सासरी मोजक्याच २० ते २५ नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कीर्तीच्या खुनानंतर आरोपी आईसह एक जण स्वत: वीरगाव पोलीस ठाण्यात येऊन घटनेची कबुली दिली होती. सोमवारी आरोपींना वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस.एस. निचळ यांनी कीर्तीची आई शोभा संजय मोटेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात या घटनेतील अन्य एक आरोपी विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) असल्याचे पुढे आल्याने त्यास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालयmarriageलग्न