तुलसी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरी... अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By सागर दुबे | Updated: April 17, 2023 16:56 IST2023-04-17T16:56:00+5:302023-04-17T16:56:00+5:30

संध्याकाळी ५.३० च्या सुमारास उघडकीस आला प्रकार

Broad daylight robbery in Tulsi apartment... Case registered against unknown thieves | तुलसी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरी... अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

तुलसी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरी... अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : एम.जे. कॉलेज मागील आयडियल कॉलनीत भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख १९ हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी घडली. ललीत खडगे यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एम.जे.कॉलेज मागील आयडीयल कॉलनी सानिका कॉर्नर शेजारीच तुलसी अपार्टमेंट आहे. येथे ललित वसंत खडके हे कुटूंबीयांसह वास्तव्यास असून शुक्रवारी ते बांभोरी येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास परिवारासह गेले होते. संध्याकाळी ५.३० ला त्यांची चुलत बहीण ज्योती चौधरी हिने फोन करून तुमचे घर उघडे आहे, सामान अस्ताव्यस्त पडले असल्याची माहिती दिली.

तत्काळ ललीत यांनी घराकडे धाव घेत पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तर लोखंडी कपाटाचे लॉक तोडलेले होते. घरातून सोने चांदीचे दागिने, अंगठ्या तसेच रोख रक्क्कम अशी एकूण १ लाख १९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार रविवारी ललित खडके यांचे फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Broad daylight robbery in Tulsi apartment... Case registered against unknown thieves

टॅग्स :Jalgaonजळगाव