लाचखोर हवालदारास 1 दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:22 PM2019-04-03T20:22:03+5:302019-04-03T20:23:27+5:30

त्याच्या घरझडतीत त्याच्या नावाने एक फ्लॅट, दोन गाडय़ा आणि 13 ग्रॅम सोन्याचे दागिने इतकी मालमत्ता असल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रंनी दिली.

bribery police constable got 1 day police custody | लाचखोर हवालदारास 1 दिवसाची पोलीस कोठडी

लाचखोर हवालदारास 1 दिवसाची पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देमिसाळ याची नेमणूक शहर पोलीस मुख्यालयात असून तो गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिट-4 येथे प्रतिनियुक्तीवर आहे.याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर पुढील तपास करत आहेत.

ठाणे - उल्हासनगरात 80 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला पोलीस हवालदार रामदास मिसाळ (46) याला बुधवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरझडतीत त्याच्या नावाने एक फ्लॅट, दोन गाडय़ा आणि 13 ग्रॅम सोन्याचे दागिने इतकी मालमत्ता असल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रंनी दिली.

मिसाळ याची नेमणूक शहर पोलीस मुख्यालयात असून तो गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिट-4 येथे प्रतिनियुक्तीवर आहे. सोने हस्तगत झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्याने एक लाख 35 हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती 80 हजार देणो ठरले. दरम्यान, तक्रारदाराने याप्रकरणी ठाणो लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सापळा रचून त्याच्याच गाडीत 8क् हजार घेताना पकडले. त्यानंतर, त्याच्या घराची झडती घेतल्यावर कल्याणमध्ये एक फ्लॅट, एक चारचाकी आणि एक दुचाकी अशा दोन गाडय़ा, 13 ग्रॅम वजनाचे दागिने, घरात जवळपास सव्वा लाखाचे घरगुती साहित्य आणि काही रोकड आढळून आली आहे. याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: bribery police constable got 1 day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.