शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लाचखोर वनरक्षकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:51 IST

१० हजारांची स्वीकारली लाच; रेती वाहतुकीसाठी १५ हजारांची मागणी

ठळक मुद्देअतुल प्रभाकर धात्रक (३४) असे त्या वनरक्षकाचे नाव असून तो देलोडा बिटमधील मरेगाव उपक्षेत्रात कार्यरत आहे. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान १५ हजारांऐवजी तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.

आरमोरी (गडचिरोली) - रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करणे तसेच यापुढेही संबंधित रेती वाहतूकदारास अभय देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. अतुल प्रभाकर धात्रक (३४) असे त्या वनरक्षकाचे नाव असून तो देलोडा बिटमधील मरेगाव उपक्षेत्रात कार्यरत आहे. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेती वाहतुकीवरील ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक धात्रक याने १५ हजार रुपये मागितले होते. संबंधित वाहतुकदाराने याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान १५ हजारांऐवजी तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार धात्रक याला पैसे घेताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे धात्रक याने १५ दिवसांपूर्वी रेतीची वाहतूक करणारे काही ट्रॅक्टर पकडले होते. आरोपी धात्रक याच्याविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, नत्थू धोटे, नाईक पोलीस शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, सोनी तावाडे, सोनल आत्राम, तुळशिराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक