शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मंत्रालयात बॉम्ब ठेवलाय; मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून गृहविभागाला पाठवला ईमेल

By पूनम अपराज | Published: June 21, 2021 10:12 PM

Bomb threat in Mantralaya : महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. 

ठळक मुद्देराज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली आहे.

पूनम अपराज

मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देणारा ई मेल प्राप्त झाल्याने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिसांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे मंत्रालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. 

आज सायंकाळी ६ वाजता मंत्रालयातील सुरक्षा विभागाला धमकीचा मेल प्राप्त झाला. त्यानुसार बॉम्ब नाशक आणि शोधक पथक मंत्रालय परिसरात पोहचले आणि परिसर पिंजून काढला. 

 

पुण्यातून एकाला अटक

मंञालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल पुण्यातून आला होता. याठिकाणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुलाला शाळेत एडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा ईमेल केला. शैलेश हा घोरपडी येथील राहणारा आहेयाप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत

राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या फेक मेलने मोठी खळबळ उडाली आहे. ३० मे रोजी देखील एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली.  

३० मे रोजी मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयBombsस्फोटकेPoliceपोलिसBDDS Teamबीडीडीएस