Breaking: Big plot of terrorists foiled; 7 kg explosives seized at Jammu bus stand | Breaking : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; जम्मू बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटकं केली जप्त 

Breaking : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; जम्मू बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटकं केली जप्त 

ठळक मुद्देजम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे.

जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की, पुलवामाच्या भ्याड हल्ल्याच्या दोन वर्ष पूर्ण होत असून त्यापार्श्वभूमीवर दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते. सध्या सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील.

जम्मूमध्ये गर्दी असलेल्या सामान्य बसस्थानकाजवळ आज ७ किलोग्राम स्फोटकं(आयईडी) आढळले. जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील बारी ब्राह्मणा भागातील कुंजवाणी येथून पोलिसांनी दोन प्रमुख दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आयईडी जप्त करण्यात आला आहे. 

हे उपकरण विशिष्ट माहितीवरुन कार्य करताना आढळले होते, २०१९ च्या पुलवामा हल्ल्याला २ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर स्फोट घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

गेल्या वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांच्या आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या हत्येप्रकरणी वाँटेडअसलेल्या रेझिस्टंट फ्रंट (टीआरएफ) शी संबंधित एक दहशतवादी संघटनेचा दहशतवादी झहूर अहमद राथेर याला शनिवारी साम्बाच्या बारी ब्राह्मण भागात अटक करण्यात आली.

याआधी ६ फेब्रुवारीला लष्कर-ए-मुस्तफा (एलईएम) चा सेल्फ स्टाईल कमांडर हिदायतुल्लाह मलिक उर्फ ​​"हसनैन" याला जम्मूच्या कुंजवाणी भागातून पकडण्यात आला होता, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. दोन वर्षांपूर्वी या दिवशी, पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ७० वाहनांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि ४० जवान शहीद झाले.

Web Title: Breaking: Big plot of terrorists foiled; 7 kg explosives seized at Jammu bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.