शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी आग्रह केला, नकार देताच तरुणीच्या पाठीत चाकू खुपसला, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 09:46 IST

Crime News: पोलिसांनी एका तरुणीच्या हत्येच्या धक्कादायक घटनेचा उगलडा केला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधून पोलिसांनी एका तरुणीच्या हत्येच्या धक्कादायक घटनेचा उगलडा केला आहे. आरोपींनी सुरुवातीला या तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार देताच या नराधमांनी चाकूने भोसकून तिच्या शरीराची चाळण केली. (Crime News) अखेरीस जेव्हा चाकू तिच्या मणक्यामध्ये अडकला तेव्हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह ३ जणांना अटक केली आहे.  (The boyfriend's friends insisted on having sex, but when he refused, he stabbed the girl in the back)

लखनौमधील सरोजिनीनगर परिसरातील पोलिसांनी एका तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. यादरम्यान या तरुणीची ओळख स्कूटर इंडिया येथील रहिवाशाच्या रूपात पटली. ती मुळची सीतापूर येथील रहिवासी होती. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी १२ जून रोदी संध्याकाळी बेपत्ता झाली होती. त्यावेळी तिचे वडील ड्युटीवर गेले होते, तर आई तिच्या गावी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी मोहम्मद कैफ नावाच्या तरुणासोबत फोनवर बोलत असे. तो तरुण सरोजिनीनगरमधील रहिवासी होती. गेल्या एक महिन्यापासून ही तरुणी त्याच्याशी बोलत होती. १२ जून रोजी तरुणीने मोहम्मद कैफला सांगितले की, तिचे वडील घरी नाहीत, तर आई गावात गेली आहे. हे समजल्यावर कैफने तिला बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार केले.  

मोहम्मद कैफ हा आकाश आणि विशाल कश्यप या मित्रांसमोरच या तरुणीशी बोलत होता. तिथेच मोहम्मद कैफच्या मित्रांनी या तरुणीवर जबरदस्ती करण्याचे कारस्थान रचले. त्यानंतर तो या तरुणीला नवोदय विद्यालयाच्या समोर असलेल्या सुमसान जंगलात घेऊन गेला. तिथे विशाल आणि आकाशही पोहोचले. तिथे त्यांनी या तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. तेव्हा आकाश आणि विशालने तिला पकडले. त्यानंतर विशाल याने तिच्या पाठीत चाकू खूपसला. तेव्हा ही तरुणी जीव वाचवण्यासाठी कच्च्या रस्त्याच्या दिशेने धावली.  तेव्हा या तिघांनीही तिला पकडले आणि ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत