प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुणाने सुरतमध्ये केली हत्या, टी- शर्टमुळे उलघडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:32 IST2022-12-15T17:35:20+5:302022-12-15T19:32:33+5:30

एका तरुणाला त्याची प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला होता, लग्नापासून वाचण्यासाठी त्या तरुणाने त्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

boyfriend took girlfriend to surat from odisha then stabbed 49 times to escape marriage twisted love | प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुणाने सुरतमध्ये केली हत्या, टी- शर्टमुळे उलघडली घटना

प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुणाने सुरतमध्ये केली हत्या, टी- शर्टमुळे उलघडली घटना

एका तरुणाला त्याची प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला होता, लग्नापासून वाचण्यासाठी त्या तरुणाने त्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा उलघडा एका टी शर्टने केला आहे. तरुण आणि तरुणी ओडिशामधील राहणारे होते, या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रेम संबंध होते, तरुणीने लग्नासाठी तरुणाला तगादा लावला होता. यातून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

लग्न टाळण्यासाठी या तरुणाने भयानक प्लॅन बनवला. प्रेयसी तिच्या प्रियकरावर लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होती. यामुळे त्रासून त्याने मुलीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ओडिशातील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्या मैत्रिणीला गुजरातमधील सुरत येथे आणून तिची हत्या केली. तरुणीवर 49 वेळा हल्ला केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर मृतदेह तेथे फेकून त्याने पळ काढला. मुलीच्या हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांना टी-शर्टमुळे आरोपीपर्यंत पोहोचता आले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना 28 नोव्हेंबर रोजी अमरोली परिसरात घडली.

आरोपीपासून सुटका करण्यासाठी जगन्नाथ गोडा याने कुनीदार सीमादासची हत्या करण्याचे ठरवले. त्याने तरुणीला गुजरातमधील सुरत येथे नेले. त्याने मुलीवर चाकूने 49 वार केल्याची त्याने पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर मृतदेह एका निर्जन शेतात फेकून दिला आणि परत भुवनेश्वरला परतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू'; तलवार घेऊन मागे लागले, खंड्या, बघ्या, दोधा, बटाट्याविरुध्द गुन्हा दाखल

मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. या मुलीची माहिती घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर टीमने रेल्वे स्टेशन, बस स्टँडसह अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये तरुणीने परिधान केलेल्या टी-शर्टमुळे तिची ओळख पटली. मुलीचे भुवनेश्वरमध्ये राहणाऱ्या जगन्नाथ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला लग्न करायचे होते, पण प्रियकर त्यासाठी तयार नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकरापासून सुटका करून घेण्यासाठी आरोपीने तिची हत्या केली.

Web Title: boyfriend took girlfriend to surat from odisha then stabbed 49 times to escape marriage twisted love