बॉयफ्रेंडने 'ते' व्हिडीओ लीक केल्याने तरुणीनं उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 21:52 IST2020-03-11T21:51:13+5:302020-03-11T21:52:30+5:30

याबाबत सरदार नगर पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Boyfriend leaks private video 16 years old girl committed suicide in gujrat pda | बॉयफ्रेंडने 'ते' व्हिडीओ लीक केल्याने तरुणीनं उचलले टोकाचे पाऊल

बॉयफ्रेंडने 'ते' व्हिडीओ लीक केल्याने तरुणीनं उचलले टोकाचे पाऊल

ठळक मुद्देव्हिडीओ लिक झाल्यामुळे अल्पवयीन मुलगी नैराश्येत होती.या प्रकरणी चारपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

अहमदाबाद - अहमदाबादमधील छारानगर परिसरात एका १६ वर्षांच्या युवतीनं आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. नैराश्येतून या तरुणीने घरात सिलिंगला गळफास लावून आत्महत्या केली. कारण तिच्या प्रियकराने त्यांच्यातील काही खाजगी व्हिडीओ लीक केले होते. याबाबत सरदार नगर पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मृत तरुणी एका तरुणासोबत रिलेशनमध्ये होती. तिच्या प्रियकराने त्यांच्यातील खाजगी व्हिडीओ काढून लिक केल्यानं या तरुणीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना छारानगर परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रियकराने त्याच्या तीन मित्रांकडे ते व्हिडीओ लिक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ लिक झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी प्रियकर आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

व्हिडीओ लिक झाल्यामुळे अल्पवयीन मुलगी नैराश्येत होती. त्यातूनच सोमवारी संध्याकाळी टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांनी माहिती दिली. दोघांनीही एकमेकांच्या संमतीनं शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र तिच्या प्रियकरानं याचा व्हिडीओ तयार करून तो आपल्या मित्रांसोबत शेअर केला. आरोपी प्रियकराविरोधात भा. दं. वि आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तीन मित्रांवर आयटी अ‍ॅक्टनुसार व्हिडीओ लिक केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चारपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे.

Web Title: Boyfriend leaks private video 16 years old girl committed suicide in gujrat pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.