शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, दुसऱ्या तरूणाशी लग्न ठरल्याच्या रागातून आवळला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:46 IST

Murder And Suicide Case : डोंबिवलीतील हायफ्रोफाईल संकुलातील घटना

डोंबिवली: प्रेयसीचे दुस-या तरूणाशी लग्न (Marriage)ठरल्याच्या रागातून प्रियकराने तीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुर्वेकडील कासारिओ गोल्ड गृहसंकुलातील म्युरियल बिल्डींगमध्ये सोमवारी घडली. दोघांचे मृतदेह घरातील (House)  बेडरूमध्ये आढळून आले होते. दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तीची हत्या गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृत प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा मानपाडा पोलिस (police)  ठाण्यात दाखल करण्यात आला.

अनिल मधुकर साळुंके (वय ३३) राहणार वडनेर भैरव, नाशिक आणि ललीता सुरेश काळे (वय २८) रा. डोंबिवली अशी दोघा मृत प्रियकर, प्रेयसीची नावे आहेत. दोघांमध्ये गेल्या सहा वर्षापासून प्रेम होते. त्यानेच ललीताला डोंबिवलीत भाडयाने घर घेऊन दिले होते. तेथे ललीता आई आणि बहीणीसह राहायची. त्यांच्या घरच्यांनाही दोघांच्या संबंधांबाबत माहीती असल्याने अनिल त्यांच्या डोंबिवलीतील घरात अधूनमधून यायचा. दरम्यान अनिल हा विवाहीत असून त्याला दोन मुले देखील आहेत, अशी माहीती ललीताला समजल्यानंतर तीनेही अन्य एका तरूणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीचा तरूणासोबत साखरपुडा देखील झाला होता. याचा राग अनिलला होता. दरम्यान शेवटचे भेटायचे आहे तसेच दोन लाख रूपये दयायचे आहेत असा बहाणा करून अनिल तिला रविवारी संध्याकाळी भेटण्यासाठी घरी आला. रात्री बेडरूममध्ये तिच्यासोबत झोपला असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याने नायलॉन दोरीने ललीताचा गळा आवळून तसेच नाका तोंडावर उशी दाबून तीची हत्या केली आणि त्यानंतर त्याच नायलॉनच्या दोरीने छताच्या पंख्याला गळफास लावून स्वत:ने आत्महत्या केली. ललीताच्या बहिणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात मृत अनिल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे....आणि हत्या झाल्याचे उघडसोमवारी सकाळी 11 वाजले तरी बेडरूमचा दरवाजा न उघडला गेल्याने ललीताच्या बहिणाने दरवाजा ठोठावून बघितला. परंतू तो आतून प्रतिसाद मिळाला नाही. तीने आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा धककादायक प्रकार समोर आला. अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला तर ललीताचा मृतदेह बेडवर आढळुन आला. प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज बांधण्यात आला. परंतू ललीताची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसDeathमृत्यू