Murder Mistry: प्रेयसीच्या जिजुला मीच मारले; नशेत प्रियकर अनैतिक संबंधांबाबत बडबडून गेला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:47 PM2021-07-28T18:47:46+5:302021-07-28T18:57:40+5:30

Boyfriend killed Girlfriend Sister's husband: पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नव्हता. जवळपास 200 लोकांची चौकशी करण्यात आली. मात्र आरोपी कोण हेच पोलिसांना समजत नव्हते.

boyfriend chatted about immoral relationship, and Murder Mistry solved in Madhya pradesh | Murder Mistry: प्रेयसीच्या जिजुला मीच मारले; नशेत प्रियकर अनैतिक संबंधांबाबत बडबडून गेला, अन्...

Murder Mistry: प्रेयसीच्या जिजुला मीच मारले; नशेत प्रियकर अनैतिक संबंधांबाबत बडबडून गेला, अन्...

Next

आपल्या मेहुणीला आपल्याच गावातील दारुड्या तरुणाबरोबर रंग उधळताना तिच्या बहीणीच्या नवऱ्याने पाहिले होते. त्याने घरच्यांना सांगितले तर गोंधळ होईल म्हणून मेहुणीने प्रियकराच्या मदतीने जीजूचा काटा काढला होता. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील तेंदूखेडा पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना सात महिन्यांपूर्वी घडली होती. पोलिसांना (Police) काहीच सुगावा लागत नव्हता. परंतू दारुड्या प्रियकराने एके ठिकाणी तोंड उघडले आणि सारा खेळ संपला. (Boyfriend killed Girlfriend Sister's husband, because he saw them)

पोलिसांनी सांगितले की, 17 जानेवारीला रम्पुराच्या गौतम कुर्मी यांच्या शेतातील घरात संतोष यादव यांचा मतदेह आढळला होता. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह होता. कोणीतरी धारधार हत्याराने त्यांचा खून केल्याचे दिसत होते. या प्रकरणी पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नव्हता. जवळपास 200 लोकांची चौकशी करण्यात आली. मात्र आरोपी कोण हेच पोलिसांना समजत नव्हते. फाईल बंद होणार होती, एवढ्या 26 जुलैची रात्र उजाडली आणि अशी घटना घडली की फाईलवर बसलेली धूळ पुन्हा पोलिसांनी झटकली. 

गावातील क्रिकेट मैदानाच्या बाजुला एक दारुडा युवक नशेमध्ये जोरजोरात बडबडत होता. संतोष यादवला त्याच्या मेहुणीसोबतचे लफडे समजले होते, यामुळे मी त्याला मारुन टाकले असे तो बडबडत होता. ते अज्ञाताने ऐकले आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी लगेचच त्या प्रियकराला म्हणजेच संदीप चढ़ार (28) ला ताब्यात घेतले आणि गुन्हा वदवून घेतला. मेहुणीसोबत संदीपला शारिरीक संबंध ठेवत असताना तिच्या जीजूने म्हणजेच संतोषने रंगेहाथ पकडले होते. यानंतर संतोषने त्याला मारहाणही केली होती. 

या रागातून प्रियकर संदीपने प्रेयसीला विश्वासात घेऊन कट रचला. तिने फोन करून संदीपला संतोष शेतात झोपायला गेल्याचे कळविले. यानंतर संदीपने त्याचा खून केला. पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आणि पोलीस कोठडी मिळविली आहे. 

Web Title: boyfriend chatted about immoral relationship, and Murder Mistry solved in Madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app